Mamata Banerjee : ''वाचले तर पुन्हा भेटू'', ममता बॅनर्जींनी व्यक्त केली हत्या होण्याची भीती; भाजप नेत्याचं 'ते' विधान काय होतं?

बलुरघाट लोकसभा मतदारसंघातील कुमारगंज येथे पक्षाचे उमेदवार आणि राज्यमंत्री बिप्लब मित्रा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप मला आणि अभिषेकला निशाणा बनवत आहे.
Mamata Banerjee
Mamata Banerjeesakal

Loksabha election 2024 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतःसह पुतण्याची हत्या होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी २० मिनिटांच्या भाषणानंतर एक शेर म्हणत मोठा दावा केला आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, बॉम्बस्फोटाच्या गोष्टी होत आहेत.. मी आणि अभिषेक टार्गेटवर आहोत. हे लोक आमचा जीव घेऊ शकतात. असं म्हणत ममतांनी एक शेर म्हटला, रहा गुलशन तो फुल खिलेंगे, रही जिंदगी तो फिर मिलेंगे.

Mamata Banerjee
Arvind Kejriwal : लग्नापूर्वीच अरविंद केजरीवालांनी पत्नीला विचारला होता 'हा' प्रश्न; खुद्द सुनीता केजरीवालांनी सांगितलं

वास्तविक भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी शनिवारी म्हटलं होतं की, या आठवड्यात एक मोठा बॉम्ब फुटेल. उद्या रविवारी आहे, उद्यापासून नवीन आठवडा सुरु होतोय. या आठवड्याच्या सुरुवातीला असा बॉम्ब फुटेल की टीएमसी हे संकट झेलू शकणार नाही.

बलुरघाट लोकसभा मतदारसंघातील कुमारगंज येथे पक्षाचे उमेदवार आणि राज्यमंत्री बिप्लब मित्रा यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप मला आणि अभिषेकला निशाणा बनवत आहे. आम्ही सुरक्षित नाहीत, परंतु आम्ही केंद्रातल्या सत्तारुढ पक्षाच्या कटकारस्थानांना भीत नाहीत.

Mamata Banerjee
Akola News : समाज, देश एकसंघ राहण्यासाठी संविधानाचे उद्दिष्ट महत्वाचे ; प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली मोठी अपेक्षा

ममता बॅनर्जींनी भाजवर धर्माच्या आधारावर राजकारण करीत आसल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, दुरदर्शनचा लोगो अचानक भगवा कसा झाला? सेनेच्या जवानांचे घरं भगव्या रंगांनी का रंगवले? काशी विश्वनाथ मंदिरात पोलिसांची वर्दी भगवी का केली? असे प्रश्न उपस्थित करुन त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com