दीदी V/S मोदी

कोलकाता - पश्‍चिम बंगाल आणि कोलकाता पोलिस यांच्या संयुक्त पदक प्रदान कार्यक्रमाला सोमवारी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री मतता बॅनर्जी आणि कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार.
कोलकाता - पश्‍चिम बंगाल आणि कोलकाता पोलिस यांच्या संयुक्त पदक प्रदान कार्यक्रमाला सोमवारी उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री मतता बॅनर्जी आणि कोलकात्याचे पोलिस आयुक्त राजीव कुमार.

कोलकता, नवी दिल्ली - चिटफंडप्रकरणी कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी आलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना रोखल्यानंतर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन सुरू केल्यामुळे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात आपला सत्याग्रह सुरूच राहील, असे ममतांनी आज जाहीर केले. दरम्यान, पश्‍चिम बंगालमधील परिस्थिती दुर्दैवी असल्याचे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी लोकसभेत बोलताना व्यक्त केले. सीबीआयने आज सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कोलकाता पोलिसांच्या विरोधात दोन याचिका दाखल केल्या. या याचिकांवर मंगळवारी सुनावणी घेण्यात येईल, असे 

 सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने जाहीर केले. ममतांनी सुरू केलेल्या आंदोलनाला अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.
चिटफंड गैरव्यवहार प्रकरणात कोलकत्याच्या पोलिस आयुक्तांची चौकशी करण्याच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रयत्नांच्या विरोधात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाचा आज (ता. ४) दुसरा दिवस होता. हे धरणे आंदोलन आठ फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहील, असा निर्धारही ममतांनी व्यक्त केला. दरम्यान, संविधान आणि देशाला वाचविण्यासाठी आपण हे धरणे आंदोलन सुरू केले असून, आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ते सुरूच राहील, अशी घोषणाही ममतांनी केली. 

कोलकता पोलिस आणि सीबीआय यांच्यातील संघर्षात ममता यांनी उडी घेतल्यामुळे हा वाद चिघळणार असल्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ममतांच्या धरणे आंदोलनाचे पडसाद देशाच्या राजधानीसह अनेक राज्यांमध्ये उमटले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आकाराला येत असलेल्या भाजप-विरोधी आघाडीतील जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी आज ममतांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. एकूणच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह भाजपच्या नेतृत्वाच्या विरोधात या आंदोलनाच्या माध्यमातून आघाडी उघडण्याचा प्रयत्न ममता यांच्याकडून सुरू आहेत. 

‘देश आणि संविधानाला वाचविण्याचे माझे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील,’’ अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख असलेल्या ममतांनी आंदोलनस्थळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. मोदी सरकारच्या विरोधात रविवारपासून धरणे आंदोलन करीत असलेल्या ममता आज पुन्हा केंद्रावर बरसल्या. 

आंदोलन अराजकीय - ममता
कोलकत्यातील मेट्रो चॅनेल स्टेशनसमोर रविवारी रात्रीपासून ममतांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी उभारलेल्या तंबूत ममता यांचे धरणे आंदोलन सुरू असून, हे आंदोलन राजकीय नाही, असे त्यांनी सांगितले.

आमचे आंदोलन राजकीय स्वरूपाचे नाही. मात्र, राजकीय पक्षांनी दिलेल्या पांठिब्याचा आम्ही स्वीकार करू, असे त्यांनी जाहीर केले. ममतांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्तेही आज पश्‍चिम बंगालमध्ये रस्त्यावर उतरले होते. त्यांनी अनेक ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या पुतळ्यांचे दहन केले

आजच्या घडामोडी
 सत्याग्रहावर ममता ठाम; घटना वाचवेपर्यंत आंदोलन सुरूच 
 सत्याग्रह अराजकीय; पण कोणी पाठिंबा दिल्यास स्वागत - ममता 
 पश्‍चिम बंगालमधील घडामोडी दुर्दैवी - राजनाथसिंह 
 प. बंगालच्या राज्यपालांचा अहवाल केंद्राला सादर 
 सीबीआयपासून वाचवण्यासाठी ममतांचे आंदोलन - जावडेकर 
 राजीव कुमार यांना वाचवायचा प्रयत्न - रवीशंकर प्रसाद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com