56 इंचाची छाती असणाऱ्याने राफेलबाबत खरे सांगावे : वड्रा

56 इंचाची छाती असणाऱ्याने राफेलबाबत खरे सांगावे : वड्रा

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांनी राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ''56 इंचाची छाती असणाऱ्याने राफेल कराराबाबत आतातरी खरी बोलावे'', अशा शब्दांत वड्रा यांनी पंतप्रधान मोदींवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल केला. 

भाजपने काल (मंगळवार) वड्रा यांच्यावर आरोप केले होते. यामध्ये भाजपने सांगितले, की वड्रा यांना लंडनमध्ये एक अपार्टमेंट आणि झुरीचचे विमान तिकीट मिळाले होते. व्यावसायिकांना मदत करण्यासाठी त्यांना हे सगळे मिळाले असल्याचा असा आरोप वड्रा यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर वड्रा यांनी सांगितले, की ''राफेल करारावर सुरवातीला मी आश्चर्यचकित झालो होतो. मात्र, हे सगळं फार्स झाले आहे. भाजप प्रत्येकवेळी आमचे नाव घेत आहे. मग रुपयाची घसरण असो, इंधनाच्या किमतीत वाढ, या प्रत्येकात आपले नाव घेतले जात आहे''. 

दरम्यान, वड्रा यांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधत पुढे म्हणाले, ''सत्ताधारी पक्ष देशातील तपास यंत्रणांचा अयोग्य पद्धतीने वापर करत आहे. त्यामुळे 56 इंचाची छाती असणाऱयांनी राफेल कराराबाबत खरे बोलावे''. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com