
बँकेतून ९ लाख रुपये काढलेल्या तरुणाला ४ जणांनी अडवून त्याचं अपहरण केलं. कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्याला मारहाण करण्यात आली आणि दोन किमी अंतरावर कारमधून फेकून देण्यात आल्याची घटना राजस्थानच्या जयपूरमध्ये घडलीय. भरदिवसा घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे तरुण मला वाचवा असं ओरडत असताना बघ्यांनी व्हिडीओ शूट केले. दुर्गापुरा एसएल कटजवळ ही घटना घडली.