काँग्रेस प्रवक्त्यांच्या मुलीला बलात्काराची धमकी देणारा अटकेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

मुंबई : कॉंग्रेस प्रवक्त्या प्रियांका चर्तुवेदी यांना ट्विटरवर मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्याला मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी एकत्रितपणे अटक केली. मुंबईचा रहिवासी असलेला आरोपी गिरीष माहेश्वर याला अहमदाबाद येथे अटक केली. 

बलात्काराची धमकी देणाऱ्या या आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करुन त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे गृहमंत्रालयाडून मुबंई पोलिसांना देण्यात आले आहेत. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही दिल्ली पोलिस आयुक्त अमुल्य पटनाईक यांना अल्पवयीन मुलीला धमकी दिल्याबद्दल आरोपी गिरीष माहेश्वर विरुद्ध तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. 
गिरीष माहेश्वरविरुद्ध 3 जुलैला तुघलक रोड पोलिस ठाण्यात 509,506 आणि 469 कलमाखाली तक्रार नोंदवली होती.

Web Title: Man Accused Of Threatening Congress Leader Priyanka Chaturvedi On Twitter Arrested