शस्त्राने शीर केलं धडावेगळं; मदुराईत दिवसाढवळ्या नृशंस हत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 November 2020

ही घटना मदुराईमधल्या किझहावसाल परिसरातील अगदी वर्दळीच्या जागी घडली आहे. 

मदुराई : तमिळनाडूच्या मदुराईमध्ये एका व्यक्तीची दिवसाढवळ्या अत्यंत नृशंस पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. हत्याऱ्याने या व्यक्तीचे शीर त्याच्या धडापासून वेगळे केले आहे. हे वेगळे केलेले शीर त्याने एका चर्चच्या समोर आणून फेकले आहे. जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेला आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. ही घटना मदुराईमधल्या किझहावसाल परिसरातील अगदी वर्दळीच्या जागी घडली आहे. 

हेही वाचा - देवाच्या पायावर डोके असतानाच माजी काँग्रेस आमदाराचा हार्ट अटॅकने मृत्यू; CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

ज्या व्यक्तीचे शीर धडावेगळे करण्यात आले आहे त्या व्यक्तीचे नाव मुरुगनंदम असल्याचे सांगितलं जात आहे. ही व्यक्ती आपल्या कारमधून येत असताना तिला अडवलं  गेलं. आणि अगदी क्षणार्धात त्या व्यक्तीची हत्या केली गेली. जवळून जाणाऱ्या एका वाटसरुने ही घटना पाहिल्यावर तिला जबर धक्काच बसला. सोमवारी ही घटना घडली आहे. 

हेही वाचा - 'काँग्रेसला उत्तरेच शोधायची नाहीयेत; आत्मपरिक्षणाची वेळही निघून गेलीय'

हल्लेखोरांनी मुरुगनंदम यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचे शीर धडावेगळे केले. ते शीर त्यांनी मदुराईतील सेंट मेरी चर्चच्या समोर आणून फेकले होते. सध्या या घटनेचा तपास पोलिस अधिकारी करत आहेत. पोलिसांनी या घटनेतील हल्लेखोरांची कार जप्त केली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man beheaded in madurai in wee hours

Tags
टॉपिकस
Topic Tags: