Crime: पत्नी ट्रक ड्रायव्हरसोबत गुपचूप फोनवर बोलायची; पती चांगलाच संतापला, आधी गोळीबार अन् नंतर दोन्ही कान कापले
Rajasthan Crime News: पत्नी ट्रक ड्रायव्हरसोबत गुपचूप फोनवर बोलायची. यामुळे पतीला राग आला. त्यानंतर त्याने एक धक्कादायक कृत्य केले आहे. रागातून त्याने थेट कान कापल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकरावर गोळीबार केला. त्यानंतर त्याचे दोन्ही कान कापण्यात आले. बुधवारी रात्री जोधपूरच्या बोरानाडा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे.