
बापरे! युट्यूब बघून फार्मसी विद्यार्थ्यांनी केली लिंगबदल शस्त्रक्रिया; एकाचा मृत्यू
फार्मसीच्या दोन विद्यार्थ्यांनी यूट्युब (YouTube) वरील व्हिडिओ पाहून एका व्यक्तीवर लिंगबदल शस्त्रक्रिया (sex reassignment surgery) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दोघांनी ही शस्त्रक्रीया प्रजनन चक्क एका खाजगी हॉटेलच्या खोलीत केल्याची घटना गुरुवारी नेल्लोर येथे घडली असून, यामध्ये एका विवाहीत पुरुषाचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे, हे दोघे नेल्लोरमधील एका खासगी महाविद्यालयात बी फार्मसीचे विद्यार्थी आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पत्निला सोडून एकटा राहाणारा 28 वर्षिय तरुण या दोन विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला होता. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया करण्याच्या प्रयत्नादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाला ज्यामुळे व्यक्तिचा त्वरित मृत्यू झाला. तसेच ज्या खोलीत प्रक्रिया पार पडली ती खोली देखील अस्वच्छ होती. आरोपींकडे शस्त्रक्रियेचे कसलीही माहिती नव्हती, तसेच त्यांनी माहिती मिळवण्यासाठी एकमेव सोर्स म्हणून YouTube चा वापर केला.
पीडित व्यक्ती प्रकाशम जिल्ह्यातील जरुगुमल्ली मंडलातील कामेपल्ली गावातील मूळ रहिवासी आहे. लहानपणी तो हैद्राबादला गेला होते जिथे ते रोजंदारीवर काम करत होता. 2019 मध्ये त्याने आपल्या मामाच्या मुलीशी लग्न केले आणि एका वर्षातच ते वेगळे झाले. त्याने 2020 मध्ये घटस्फोट घेतला. नंतर तो प्रकाशम जिल्ह्यात स्थलांतरित झाला जिथे तो सोशल मीडियाद्वारे विशाखापट्टणममधील एका ट्रान्सजेंडर व्यक्तिच्या संपर्कात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो मस्तान आणि जीवा या दोन विद्यार्थ्यांच्या संपर्कात आला आणि हे चौघेही व्हॉट्सअॅपवर नियमित चॅट करायचे. पीडित व्यक्तिने मुंबईत लिंग बदल शस्त्रक्रिया करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मस्तान आणि जीवा यांनी त्याला सांगितले की, त्यांना शस्त्रक्रियेची माहिती आहे आणि ती स्वस्तात ती करु शकतात . त्यानंतर या विद्यार्थ्यांनी त्याला मुंबईत डॉक्टरांकडे न जाण्याबद्दल पटवून दिले, असे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर या दोघांनी नेल्लोर शहरातील गांधी बोम्मा सेंटरमधील लॉज रूममध्ये शस्त्रक्रिया करण्याची योजना आखली. त्यानंतर त्यांनी 23 फेब्रुवारीला हॉटेलमध्ये एक खोली भाड्याने घेतली आणि 24 फेब्रुवारीला ऑपरेशन करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, पीडित व्यक्तिचा मृत्यू रक्तस्त्राव आणि औषधांचा ओव्हरडोज घेतल्याने झाला. दरम्यान मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी हॉटेलमधून पळ काढला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना खोलीत मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली.