Ukraine-Russia War : ऑपरेशन गंगा अंतर्गत 5 वे विमान भारतात; 249 नागरिक परतले मायदेशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine-Russia War operation ganga 5th flight carrying 249 indian nationals stranded in ukraine reaches delhi

ऑपरेशन गंगा अंतर्गत 5 वे विमान भारतात; 249 नागरिक परतले मायदेशी

युक्रेन-रशिया (Ukraine-Russia War) युध्द सुरु असून हजारो भारतीय नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत . दरम्यान आज युक्रेन-रशिया युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 249 जणांचे पथक आज ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत पाचव्या विमानाने नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. या सर्वांना रोमानियातील बुखारेस्ट (Bucharest) विमानतळावरून आणण्यात आले आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान 15 हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना घरी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत आत्तापर्यंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसह 900 हून अधिक भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या 5 विमानांनी भारतात आणले आहे. मात्र, हजारो भारतीय अजूनही मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत.

याआधीही रोमानियाहून 219 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले तेव्हा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी विमानतळावर विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

हेही वाचा: युक्रेनला मस्क यांच्याकडून मदत, सुरू केली सॅटेलाईट इंटरनेट सेवा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले की,, “युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या बाबतीत आम्ही प्रगती करत आहोत. आमची टीम 24 तास काम करत असते. मी वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहे." ते म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी एअर इंडिया रोमानियातील बुखारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथून उड्डाणे सुरू ठेवेल.

युध्दाच्या काळात 24 फेब्रुवारीच्या सकाळी युक्रेनचे हवाई क्षेत्र नागरी विमानांच्या ऑपरेशनसाठी बंद करण्यात आले होते. त्यामुळे युक्रेनमधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी बुखारेस्ट आणि बुडापेस्ट मार्गे उड्डाणे चालवली जात आहेत.

हेही वाचा: एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन, दररोज 2GB डेटा, Disney + Hotstar देखील

Web Title: Ukraine Russia War Operation Ganga 5th Flight Carrying 249 Indian Nationals Stranded In Ukraine Reaches Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top