सोसायटीतील महिलांना आंघोळ करताना लपून शूट करायचा, २० दिवसांनी...

सोसायटीतील महिलांना आंघोळ करताना लपून शूट करायचा, २० दिवसांनी...

राजधानी दिल्लीच्या जवळील ग्रेटर नोएडाच्या एका हाउसिंग सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोसायटीत राहणाऱ्या महिलांचं चोरून चित्रीकरण करणाऱ्या एका व्यक्तीला रहिवाशांनी पकडलंय. महिला आंघोळीसाठी गेल्यानंतर हा तरुण पाईपच्या सहाय्याने मजले चढून जात असे. यानंतर मोबाईलच्या आधारे चित्रीकरण करत असल्याचं समोर आलंय. अखेर 20 दिवसांनंतर आरोपी पकडला गेला आहे. (Noida Crime News)

आरोपीचे गुन्हेगारी कृत्य गेल्या महिन्यात बिल्डिंगमधील सीसीटीव्हीत पहिल्यांदा कैद झालं. त्यानंतर सोसायटीच्या रहिवाशांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रार करूनही पोलिसांना या आरोपीला पकडण्यात यश आलं नाही.

मात्र स्थानिकांनी यासंबंधी मोहीम राबवली होती. यानंतर आरोपीला आता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहं. ग्रेटर नोएडा येथील अजनारा ले गार्डन हाऊसिंग सोसायटीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एप्रिलमधील घटनेनंतर, रहिवाशांनी सोशल मीडिया मोहीम सुरू केली आणि त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचं कळतंय.

आरोपी कसा पकडला गेला सोसायटीच्या रहिवाशाने आरोपीला बाजारात फिरताना पाहिले तेव्हा आरोपीला पकडले. सोसायटीच्या रहिवाशांनी असा दावा केला की सोसायटीमध्ये योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याने त्यांना सुरक्षित वाटत नाही.

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या हाऊसिंग सोसायटीमध्ये यापूर्वी दोन हत्या झाल्या आहेत. अशा घटनांमागे सुरक्षा कर्मचार्‍यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही सोसायटीतील रहिवाशांनी केला आहे. यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याने रहिवासी बिल्डरच्या विरोधात धरणे धरलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com