esakal | घ्या! अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस
sakal

बोलून बातमी शोधा

घ्या! अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस

घ्या! अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस

sakal_logo
By
विनायक होगाडे

बारीपाडा (ओडिशा): पहिला डोस घेऊन देखरेख कक्षात आराम करणाऱ्या व्यक्तीला निष्काळजीपणाने पुन्हा डोस दिल्याचा धक्कादायक प्रकार आज ओडिशात उघडकीस आला. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाने दिले असून चुकीने दिलेल्या दुसऱ्या डोसचा दुष्परिणाम अद्यापपर्यंत झाला नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

हेही वाचा: भयानक! कोव्हिशिल्डनंतर अवघ्या पाच मिनिटांत दिली कोव्हॅक्सीन

मयुरभंज येथील प्रसन्नकुमार साहू (वय ५१) हे रघुपुर येथील रहिवासी आहेत. त्यांनी शनिवारी लस घेण्यासाठी स्लॉट बुक केला होता. त्यानंतर ते खुंटापूर येथील सत्यसाई सरकारी शाळेतील लसीकरण केंद्रावर गेले. तेथे पहिला डोस दिल्यानंतर अर्धा तास देखरेख कक्षात थांबण्यास सांगितले. परंतु यादरम्यान एका परिचारिकेने चुकून दुसरा डोस दिला. याबाबत साहू म्हणाले, मी संबंधित परिचारिकेस लस घेतल्याचे सांगेपर्यंत त्यांनी घाईगडबडीत पुन्हा लस दिली. केंद्राचे पर्यवेक्षक राजेंद्र बेहरा म्हणाले की, दोन डोस दिल्यानंतर त्यांना आणखी दोन तास केंद्रावरच थांबवण्यात आले. तसेच ओआरएस देण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. सिपुन पांडा म्हणाले, की आरोग्य कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाची आपल्याला माहिती असून या प्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यापूर्वी चौकशी समितीकडून माहिती घेतली जाईल.

हेही वाचा: प्रताप सरनाईकांची उच्च न्यायालयात धाव

याआधी बिहारमध्ये एका महिलेला पाच मिनिटाच्या फरकाने कोव्हिशिल्ड पाठोपाठ कोव्हॅक्सीन लसीचा डोस देण्यात आल्याची घटना घडली आहे. सुनीला देवी असे महिलेचे नाव आहे. सुदैवाने लसींचे लागोपाठ दोन डोस घेऊनही सुनीला देवी यांची प्रकृती ढासळलेली नाही. त्यांची प्रकृती चांगली असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

loading image
go to top