esakal | दारू सोड म्हटल्यानं पत्नीला संपवलं; 11 वर्षांच्या लेकीनं फोडली वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

दारू सोड म्हटल्यानं पत्नीला संपवलं; 11 वर्षांच्या लेकीनं फोडली वाचा

sakal_logo
By
सुधीर काकडे

समाजात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्न केला असता, त्यातील बहुतांश गुन्हे व्यसनाधीनतून झाल्याचे दिसून येते. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. प्रयागराजमध्ये एका व्यसनाधीन व्यक्तीने आपल्या पत्नीची निघृण हत्या केल्याचे समोर आले आहे. दारु पिण्यावर आक्षेप घेतल्याच्या रागातून या व्यक्तीने टोकाचे पाउल उचलत आपल्या पत्नीची हत्या केली.

प्रयागराजमधील नाचणा गावात झालेल्या या घटनेत निरज मिश्रा नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीवर काठीने हल्ला केला. रागाच्या भरात या व्यक्तीने आपल्या पत्नीवर काठीने एवढे वार केले की, या घटनेत सदरील महिलेचा मृत्यू झाला. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानूसार हा प्रकार समजताच कौंधियारा पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा: लष्कारातील जवान पाकिस्तानी एजंटच्या संपर्कात; संशयानंतर अटक

संबंधित महिला पतीच्या दारुच्या व्यसनामुळे वैतागली होती. दारु का पितोस असा जाब तिने आपल्या पतीला विचारला. पत्नीच्या या प्रश्नाचा निरजला राग आला. त्याच रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीवर काठीने हल्ला करायला सुरुवात केले. या मारहाणीत जखमी झालेल्या पत्नीचा जागी मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर शेजाऱ्यांना समजू नये म्हणून आरोपी निरज मिश्राने आपल्या ११ वर्षाच्या मुलीला रुममध्ये कोंडले. त्यानंतर काही वेळाने ती मुलगी बाहेर पडली आणि हा प्रकार उघडकीस आला.

loading image
go to top