Rajasthan Crime
Rajasthan Crimeesakal

श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; आरोपीने ग्राइंडींग मशीनने केले मृतदेहाचे 10 तुकडे!

दिल्लीतील श्रद्धा वॉकर खून प्रकरणासारखे हृदयद्रावक प्रकरण

Man killed his aunt using hammer and cut her body: दिल्लीतील श्रद्धा वॉकर खून प्रकरणासारखे हृदयद्रावक प्रकरण राजस्थानची राजधानी जयपूरमधून समोर आलं आहे. येथे एका पुतण्याने आपल्याच विधवा काकीची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपीने अधी काकीची हत्या केली आणि नंतर मार्बल कटरने मृतदेहाचे तुकडे केल्याचे सांगितले जाते.

Rajasthan Crime
Amit Shah : अमित शाहांची तमा न बाळगता भडकल्या बॅनर्जी; नेमकं झालं काय?

त्यानंतर वेळ साधत केलेले तुकडे जंगलात टाकून दिले ही खळबळजनक घटना जयपूरच्या विधाधर नगर पोलीस स्टेशन परिसरातील घटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनुजला नावाच्या पुतण्याला दिल्लीला जायचे होते, पण काकी त्याला जाण्यापासून आडवत होती. काकीने त्याला दिल्लीला जाऊन दिले नाही, त्यामुळे तो संतापला आणि रागाच्या भरात काकीला हातोड्याने मारहाण केली.

मृत महिला कर्करोगाने त्रस्त होती. आरोपीची आईची कोविड काळात कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान मिळाल्या माहिती नुसार, आरोपी अनुज उर्फ ​​गोविंद दास दीर्घकाळ इस्कॉनशी संबंधित होता. त्याने इस्कॉनमधून दीक्षाही घेतली होती. पण याला काकीचा विरोध होता. तरीही आरोपीला किर्तनासाठी दिल्लीला जायचे होते.

Rajasthan Crime
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या चेहऱ्यावर 'फेस मास्क'; खबरदारीचा उपाय?

पहिल्यांदा दिल्लीला किर्तनासाठी गेल्याचा राग आल्याने काकीने त्यांला यावेळी जाण्यापासून रोखले. याचा राग मनात धरून त्याने काकीची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी अनुजने मार्बल कटरने मृतदेहाचे 8 ते 10 तुकडे केले आणि मृतदेहाचे तुकडे ट्रॉली बॅगमध्ये भरून दिल्ली रोडजवळील जंगलात फेकून दिले. यानंतर त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन काकी हरवल्याची तक्रार दाखल केली.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी अनुज शर्मा याने 11 डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि त्याची काकी बेपत्ता असल्याचे सांगितले. त्याच्या वक्तव्यात पोलिसांना अनेक विरोधाभास आढळून आले. पोलिस तपासात अनुजनेच काकीचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

डीसीपी नॉर्थ पॅरिस देशमुख यांनी सांगितले की, मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर दिल्लीच्या निर्जन भागात फेकण्यात आले. पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com