

Social Media Trial Leads To Youth Death Case
Esakal
केरळमध्ये सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर तरुणीनं केलेल्या आऱोपांनंतर एका ४२ वर्षीय तरुणानं गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी दीपक यू नावाच्या तरुणाने प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये तरुणीशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दीपकच्या कुटुंबियांनी तरुणीने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे आणि केवळ व्ह्यूज, पैशांसाठी व्हिडीओ बनवल्याचं म्हटलंय.