स्वत:च्या आईचा मृतदेह 18 दिवस घरात ठेवला कुजत

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कोलकाता : धार्मिक कारणांचा आधार घेत कोलकत्यातील एका मुलाने स्वत:च्या आईचा मृतदेह तब्बल 18 दिवस घरात ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तो मुलगा 38 वर्षांचा आहे. आईची कबर खणण्यासाठी त्याने मित्राची मदत मागितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 

या प्रकरणी पोलिसांनी मैत्रेय भट्टाचार्यला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची आई कृष्णा भट्टाचार्य यांचे 18 दिवसांपूर्वी निधन झाले. कोलकत्यातील सॉल्ट लेक भागातील एका दुमजली घरात मैत्रेय आणि त्याची आई असे दोघेच राहत होते. मैत्रेय बेरोजगार आहे. त्याच्या वडिलांच्या पेन्शनमधून त्यांचा घरखर्च भागत असे. 

पोलिसांना दार तोडून घरात शिरावे लागले. मैत्रेयची मानसिक स्थिती बिघडलेली होती, असे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.

मैत्रेयने पोलिसांना सांगितले, की शरीराला अग्नि देऊ नये, अशी त्याच्या आईची इच्छा होती. घरातच दफन करावे, अशी तिची इच्छा असल्याने त्याने आईचा मृतदेह घरीच ठेवला होता. त्याने घराची सर्व दारे-खिडक्‍या घट्ट बंद करून घेतल्या होत्या.

कबर खणण्यासाठी मैत्रेयने त्याच्या एका मित्राची मदत मागितली. त्यावेळी ही घटना त्याच्या मित्रास समजली आणि त्याने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. काही स्थानिक वृत्तपत्रांतील वृत्तानुसार, कुजलेल्या मृतदेहाचा वास परिसरात पसरल्यानंतर पोलिसांकडे त्यासंदर्भात तक्रारी दाखल करण्यात आली होती. 

यासंदर्भात रविवारी रात्री 10 वाजता पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली केल्या. पोलिसांना दार तोडून घरात शिरावे लागले. मैत्रेयची मानसिक स्थिती बिघडलेली होती, असे शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले.

अनेकदा किरकोळ कारणावरून त्याची शेजाऱ्यांशी भांडणे होत असल्याने त्या कुटुंबाशी फारसे कुणीही संपर्कात नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे.

Web Title: Man lives with mothers corpse for 18 days in Kolkata