
Crime News: पती ८ वर्षांपासून बेपत्ता होता, अचानक पत्नीला तो एका महिलेसोबत इन्स्टाग्रामवर रिलमध्ये डान्स करत असल्याचं दिसलं. यानंतर पत्नीने पोलिसात धाव घेत पतीचा पुन्हा शोध घ्यावा अशी विनंती केली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. उत्तर प्रदेशातील हरदोई इथं ही घटना घडलीय. आता पोलिसांनी तिच्या पतीला शोधून ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अधिक चौकशी सुरू आहे.