मशिदीत घुसून हनुमान चालीसा पठण; फेसबुक लाइव्हसुद्धा केलं

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 3 November 2020

बागपतच्या एका मशिदीमध्ये तरुणाने हनुमान चालीसेचे (Hanuman Chalisa) पठण केल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली- बागपतच्या एका मशिदीमध्ये तरुणाने हनुमान चालीसेचे (Hanuman Chalisa) पठण केल्याचे समोर आले आहे. बागपतच्या विनयपूर गावातील मशिदीमध्ये घुसून मनु पाल बंसल नावाच्या एका तरुणाने मोबाईलमध्ये हनुमान चालीसा चालवून त्याचे पठण केले. एवढेच नाही तर तरुणाने यादरम्यान फेmबुक लाईव्ह सुद्धा केले होते. 

मशिदीमध्ये हनुमान चालीसेचे पठण करताना काय म्हणाला तरुण?

तरुण बागपतमधील विनयपूर गावाचा असल्याचे सांगितले जाते. मनु पाल बंसल नावाच्या तरुणाने मशिदीमध्ये घुसून हनुमान चालीसेचे पठण केले आहे. त्याने सुरुवातीला फेसबुक लाईव्ह केले, त्यानंतर तो हनुमान चालीसा वाचू लागला. धार्मिक सौहार्द स्थापित करण्यासाठी मशिदीत हनुमान चालीसेचे पठण केले असल्याचे तरुणाचे म्हणणं आहे. तरुणाने मशिदीच्या इमामकडूनही परवानगी घेतल्याचे सांगितले जाते. 

पंतप्रधानांना वेळ मिळेना, दिव्यांग बांधव साहित्यापासून वंचितच!

मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीमध्ये हनुमान चालीसेचे पठण करणारा मनु पाल बंसल भाजपचा कार्यकर्ता आणि जनसंख्या फाऊंडेशनचा पदाधिकारी आहे. कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्याआधी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. असे असले तरी मनु पाल बंसल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मथुरामधील नंदगांव येथील नंद भवन मंदिरात नमाज पढल्यामुळे सोमवारी मथुरा पोलिसांनी फैसल खानला दिल्लीतील जामिया नगरमधून अटक केली होती. दुसरीकडे उत्तर प्रदेशातील मथुरामध्ये गोवर्धन भागात ईदगाद मशिदीत चार तरुणांनी हनुमान चालीसेचे पठण केले होते. मंगळवारी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man recite Hanuman Chalisa inside a mosque bagpat