गोळी लागली पण बीडी नाही सोडली; व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था
Monday, 29 June 2020

एका व्यक्तीला गोळी लागल्यानंतर उपचारासाठी स्ट्रेचरवरून रुग्णालयात चालवले होते. पण, स्ट्रेचरवर असतानाही त्यांनी हातातील बीडी न सोडता झुरका घेत आहेत, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चंदीगडः एका व्यक्तीला गोळी लागल्यानंतर उपचारासाठी स्ट्रेचरवरून रुग्णालयात चालवले होते. पण, स्ट्रेचरवर असतानाही त्यांनी हातातील बीडी न सोडता झुरका घेत आहेत, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याचा Live Video...

व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना जीव प्रिय की बीडी असा प्रश्न नेटिझन्स उपस्थित करत आहेत. गोळी लागल्यानंतरही एखादी व्यक्ती बीडी पित असल्याची ही दुर्मिळ घटना आहे, या व्यक्तीला 16 तोफांची सलामी दिली पाहिजे, अशा प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका व्यक्तीला गोळी लागली असून, कपडे रक्ताने माखलेले आहेत. उपचारासाठी स्ट्रेचरवर घेऊन जाताना ते बीडी पीत आहे. समोर उभे असलेले पत्रकार त्या घटनेबाबत माहिती देत आहेत. पण ज्या व्यक्तीला गोळी लागली आहे. त्यांना काहीच वाटत नसून झुरके ओढत आहेत.'

हृदयद्रावक व्हिडिओ; बाय डॅडी, बाय टू ऑल...

ओडिसाचे आईपीएस अधिकारी अरूण बोथरा यांनी व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. शीर्षकामध्ये लिहिले की, 'हरियाणाच्या या व्यक्तीला गोळी लागली आहे.  रुग्णालयात स्ट्रेचरवर घेऊन जाण्याची वेळ आलेली आहे. तरी सुद्धा हा माणूस काही बीडी सोडायला तयार नाही. आणि चिनचे लोक आपल्याला जमिनी सोडायला सांगत आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man smoking beedi while lying hospital stretcher video viral