कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याचा Live Video...

वृत्तसंस्था
Monday, 29 June 2020

पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सचेंजवर आज (सोमवार) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. संबंधित हल्ल्याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामध्ये गोळीबाराचे आवाज ऐकायला येत आहेत. हल्ला करणारे चारही दहशतवादी ठार झाले आहेत.

कराची : पाकिस्तानमधील कराची स्टॉक एक्सचेंजवर आज (सोमवार) सकाळी दहशतवादी हल्ला झाला. संबंधित हल्ल्याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यामध्ये गोळीबाराचे आवाज ऐकायला येत आहेत. हल्ला करणारे चारही दहशतवादी ठार झाले आहेत.

पाकिस्तानचा रिपोर्टर बसला गाढव गाडीत अन्...

कराची स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर हल्ला झाल्यानंतर एकाने मोबाईलवरून शुटींग सुरू केले. संबंधित व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून, गोळीबार सुरू असल्याबरोबरच गोळ्यांचे आवाज येत आहेत. शिवाय, दहशतवादी इमारतीमध्ये प्रवेश करताना स्पष्टपणे दिसत आहे. दहशतवादी हल्ल्याचे शुटिंग करणारा बोलत असल्याचे ऐकायला मिळते. तो सांगत आहे की, 'सर मेरे सामने गोलियाँ चल रहीं है, अभी अंदर घुस गएँ है, सबको बता दे प्लीज.'

पाकिस्तानातील 40 टक्के वैमानिक बनावट...

दरम्यान, दहशतवादी हल्ला कोणी घडवून आणला याबाबत अद्याप माहिती पुढे आलेली नाही. या हल्ल्यामध्ये चार दहशतवाद्यांसह पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan stock exchange attack karachi terror attack live video viral