
Viral Video: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात काल सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. गंगा, युमना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मोरी तालुक्यातील लिवाडी-फिताडी मार्गावर एक गाडी थेट रुपिन नदीत कोसळली. सुदैवाने या गाडीत चालकाशिवाय इतर कोणी नव्हते. गाडी नदीत कोसळल्यानंतर कसाबसा चालक गाडीच्या छतावर चढला.