
Supreme Court Chaos Shoe Hurled at Chief Justice BR Gavai During Hearing
Esakal
सर्वोच्च न्यायालयात थेट सरन्यायाधीश बीआर गवई यांच्यावर बूट भिरकावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. एका वयस्क वकिलानेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला. या प्रकरणी वकिलाला ताब्यात घेण्यात आलंय. सर्वोच्च न्यायालयात सकाळी कामकाजावेळी ही घटना घडली. सुदैवाने बूट सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या प्रकाराने अचानक कोर्टरूममध्ये गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी तात्काळ वकिलाला ताब्यात घेतलं. दरम्यान, या घटनेनंतर लगेचच सरन्यायाधीश गवई यांनी शांतपणे अशा गोष्टींचा परिणाम होणारा मी शेवटचा व्यक्ती असेन असं म्हटलं. त्यानंतर पुढचं कामकाज सुरू ठेवलं.