विमानात एकाकडे आढळल्या साडेपाच कोटींच्या नोटा

पीटीआय
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

दिमापूर (नागालँड)- चॅर्टेड विमानातून प्रवास करणाऱया एका व्यावसायिकाकडे साडे पाच कोटी रुपयांच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा आढळल्या आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (मंगळवार) दिली.

अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील एक व्यावसायिक चॅर्टेड विमानातून प्रवास करत होता. विमान येथील विमानतळावर आल्यानंतर चौकशी करण्यात आली. यावेळी त्याच्याकडे चलनातून बाद करण्यात आलेल्या साडेपाच कोटी रुपयांच्या नोटा आढळून आल्या. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान त्याने ए. सिंग असे नाव सांगून बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Man travelling in chartered jet held with Rs 5.5 crore in old currency