esakal | Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ...
sakal

बोलून बातमी शोधा

man uses jcb scratch his back video viral

पाठण खाजविण्यासाठी हाताचा अथवा टॉवेलचा वापर करतो. पण, एका काकांनी चक्क जेसीबीने पाठण खाजवून घेतली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेनासे होत आहे.

Video: काकांनी जेसीबीने घेतली खाजवून पाठ...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चेन्नईः पाठण खाजविण्यासाठी हाताचा अथवा टॉवेलचा वापर करतो. पण, एका काकांनी चक्क जेसीबीने पाठण खाजवून घेतली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरेनासे होत आहे.

Video: लॉकडाऊनचा परिणाम; रोटीची अवस्था पाहा...

सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर अब्दुल नसार यांनी संबंधित व्हिडिओ अपलोड केला आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका काकांनी आपल्या दुपट्ट्याच्या मदतीने पाठ खाजवण्याचा प्रयत्न केला. पण, अचानक ते बाजूला उभा असलेल्या जेसीबीजवळ जातात. जेसीबी चालवणारा व्यक्ती जेसीबीच्या पंजाने या काकांची पाठ खाजवून देतो. पाठण खाजवून झाल्यावर हसताना दिसतात. यावरून फक्त गंमतीसाठी हा व्हिडिओ तयार केला असल्याचे पाहायला मिळते.

दरम्यान, काकांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू येत आहे. शिवाय, हा स्टंट फारच धोकादायक आहे. जर काही गडबड झाली तर जखम होऊ शकली असती. भारतीय लोक जुगाडाच्या बाबतीत सर्वात पुढे आहेत, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स नोंदवत आहेत.

loading image
go to top