पतीपासून आई बनू शकले नाही, मला प्रियकर हवा...

वृत्तसंस्था
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण मी आई होऊ शकले नाही. मला आता प्रियकर हवा आहे,

गोरखपूर (उत्तर प्रदेश): आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण मी आई होऊ शकले नाही. मला आता प्रियकर हवा आहे, असे एका महिलेने गावच्या पंचायतीच्या निर्णयादरम्यान सांगितले.

राजेशचे पाच वर्षापुर्वी सीमा सोबत विवाह झाला होता. मात्र, सीमाचा गावात राहणाऱया उमेश (27) सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघे पळून गेले होते. मात्र, पुन्हा ते चारपानी गावात आले व एका घरामध्ये संसार सुरू केला. यामुळे राजशने गावच्या पंचायतीकडे दाद मागितली. पंचायतीने सीमाला विचारले असता ती म्हणाली, 'आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली पण मी आई होऊ शकले नाही. मला आता प्रियकर हवा आहे, असे सांगितले. गावच्या प्रमुखाने सीमा बरोबर राहायचे असेल तर मेंढयांच्या कळपातील अर्धा हिस्सा तिच्या कायदेशीर पतीला द्यावा लागेल, असा आदेश उमेश पालला दिला. पंचायतीचा हा निर्णय पती, पत्नी आणि प्रियकर तिघांनाही मान्य केला.

उमेशकडे एकूण 142 मेंढया होत्या. त्याने कळपातील निम्म्या म्हणजे 71 मेंढया राजेशला दिल्या. मात्र, हे सर्व बेकायदेशीर असले तरी पंचायतीच्या माध्यमातून या विवाहबाह्य संबंधाला गावात समाज मान्यता मिळाली. पण, उमेशचे वडील राम नरेश पाल यांना हा निर्णय मान्य नाही. त्यांनी खोराबार पोलिस स्टेशनकडे धाव घेतली.

पोलिस अधीक्षक डॉ. सुनिल गुप्ता म्हणाले, 'उमेशच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजेश विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राजेशकडून मेंढ्या परत घेण्यात आल्या असून, त्या उमेशच्या वडिलांकडे देण्यात आल्या आहेत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP man who let wife go with lover in exchange for 71 sheep, held for theft