

Tourist Rush After Snowfall Triggers Traffic Chaos In Manali
Esakal
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरू असून पर्यटकही मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. पर्यटकांची संख्या वाढल्यानं वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. कुल्लू जिल्ह्यातील कोठीपासून मनालीतील एका भागावर जवळपास ८ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यात शेकडो गाड्या अडकल्या होत्या. तीन महिन्यानंतर हंगामातील पहिल्यांदा झालेल्या बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. मनालीतील हॉटेल्स फुल्ल असून गर्दीमुळे पर्यटक कुल्लूला गेले आहेत.