

Ganesh Utsav
esakal
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील प्रसिद्ध ‘मनौतियों के राजा’ गणेशोत्सवाला झूलेलाल वाटिका येथे थाटामाटात सुरुवात झाली आहे. यंदा या महोत्सवाचे २१वे वर्ष असून, १२ दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी भव्य तयारी करण्यात आली आहे. मुंबईतील सिद्धिविनायकाच्या धर्तीवर साकारलेली सहा फूट उंचीची गणेशमूर्ती हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
श्री गणेश प्राकट्य कमिटीच्या वतीने आयोजित या महोत्सवात सोमवारी सकाळी ९ वाजता वैदिक मंत्रोच्चारात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हा महोत्सव २५ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.