esakal | मोठी बातमी ! कारच्या फ्रंट सीट पॅसेंजरसाठी एअरबॅग सक्तीचे

बोलून बातमी शोधा

Car Airbag.jpg}

वाहनांची समोरासमोर धडक झाली तर समोरच्या सीटवर बसलेला प्रवासी दगावला जाऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने आता मोटार वाहनांच्या समोरच्या सीटवर ड्रायव्हरसह बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवाशासाठी  एअरबॅग अनिवार्य केले आहे.

मोठी बातमी ! कारच्या फ्रंट सीट पॅसेंजरसाठी एअरबॅग सक्तीचे
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली- वाहनांचा अपघात होतो तेव्हा सर्वाधिक धोका समोरच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला असतो. जर वाहनांची समोरासमोर धडक झाली तर समोरच्या सीटवर बसलेला प्रवासी दगावला जाऊ शकतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने आता मोटार वाहनांच्या समोरच्या सीटवर ड्रायव्हरसह बाजूच्या सीटवर बसलेल्या प्रवाशासाठी  एअरबॅग अनिवार्य केले आहे. हा नियम 1 एप्रिल 2021 नंतर उत्पादित होणाऱ्या वाहनांसाठी लागू होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने अधिसूचनाही जारी केली आहे. 

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने एअरबॅग सक्तीच्या नियमासंबंधीची अधिसूचना जारी केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कार किंवा प्रवासी वाहनात समोरच्या बाजूला बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग आता सक्तीचे असणार आहे. 

ड्रायव्हरबरोबर बसलेल्या व्यक्तीसाठीही एअरबॅग आवश्यक
मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहनांमध्ये ड्रायव्हर सीटबरोबर बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग अनिवार्य करण्यासंबंधी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने याबाबत उपाय सुचवले होते. 

हेही वाचा- 'भाजपचा पराभव हे एकच लक्ष्य; त्याग करण्याचीही तयारी'

मंत्रालयाने म्हटले की, एप्रिल 2021 च्या सुरुवातीपासून वाहनाच्या समोरच्या सीटवर बसलेल्यांसाठी एअरबॅग आवश्यक असेल. तर जुन्या वाहनांसंदर्भात 31 ऑगस्ट 2021 मध्ये सध्याच्या मॉडेलमध्ये ड्रायव्हर सीटसह एअरबॅग असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे अपघातावेळी प्रवाशांची सुरक्षा निश्चित होईल.