Mandi Bus Accident : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकाघाट उपविभागात बुधवारी एक भीषण रस्ता अपघात घडला. हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (HRTC Bus Crash) ची प्रवासी बस मासेरनजवळील तरंगलाजवळ रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.