esakal | मंदिराच्या जमिनीची देवताच ‘स्वामी’
sakal

बोलून बातमी शोधा

Supreme Court

मंदिराच्या जमिनीची देवताच ‘स्वामी’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली (पीटीआय) ः ‘देवस्थानशी संबंधित जमिनीची मालक त्या मंदिरात स्थापित देवताच असून पुजारी नेमणूक केवळ पूजा करण्यासाठी व मंदिराच्या मालमत्तेची देखभाल करण्‍यासाठी आहे,’ असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. महसूल नोंदीतून पुजाऱ्यांचे नाव हटविण्याचा आदेशही दिला.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

मंदिराशी संबंधित संपत्तीची पुजाऱ्यांनी बेकायदा विक्री करू नये, यासाठी महसूल नोंदणीतून पुजाऱ्याचे नाव हटवावे व संपत्तीचे संरक्षण करावे, असे आदेशपत्र मध्य प्रदेश सरकारने जारी केले. त्यावर पुजाऱ्यांनी आक्षेप घेत त्यांना भूस्वामित्व हक्क दिले असून कोणत्याही आदेशाने ते हिरावून घेता येणार नाही, असे पुजाऱ्यांचा दावा आहे. उच्च न्यायालयाने सरकारचा आदेश फेटाळला आहे. त्यावर मध्य प्रदेशने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली असून त्यावर आज न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. ए. एस. बोपन्ना यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. मंदिराच्या मालमत्तेची देखभाल करण्यासाठीच पुजाऱ्यांकडे जमिनीचे हक्क असतात. या जमिनीची मालकी त्यांच्याकडे नसून मंदिरातील देवता ‘भूस्वामी’ असते, असा निर्णय दिला.

हेही वाचा: नजर कैदेत असल्याचा मेहबुबा मुफ्तींचा दावा!

न्यायालय म्हणाले...

  • पुजारी हा देवस्थानच्या जमिनीचा काश्‍तकार किंवा सरकारचा आणि सामान्य भाडेकरू नसतो

  • देवस्थानच्या जमिनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी फक्त त्याच्याकडे असते

  • पुजारी किंवा व्यवस्थापन समिती केवळ सेवक असेल, मालक नाही

loading image
go to top