आता गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा'

वृत्तसंस्था
शनिवार, 1 डिसेंबर 2018

सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. हा मुद्दा चर्चेत असतानाचा आता, गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा' चे लोकेशन मिळू लागले आहे. मंदिर यही बनेगा ही स्लोगन हिंदुत्ववादी संघटनांनी फेमस केली होती. आता हीच स्लोगन टाकून हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराचे लोकेशन दिले आहे. 

पुणे- सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. हा मुद्दा चर्चेत असतानाचा आता, गुगल मॅपवरही 'मंदिर यही बनेगा' चे लोकेशन मिळू लागले आहे. मंदिर यही बनेगा ही स्लोगन हिंदुत्ववादी संघटनांनी फेमस केली होती. आता हीच स्लोगन टाकून हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराचे लोकेशन दिले आहे. 

हे लोकेशन उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरातील रामजन्मभूमीपासून जवळच दाखवण्यात आले आहे. समजा आपण जर आपल्या मोबाईलवर राम जन्मभूमीचे लोकेशन टाकले तर जवळच 'मंदिर यही बनेगा' हे लोकेशनही दिसते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत ज्या ठिकाणी बाबरी मशीद पाडण्यात आली, बरोबर त्या ठिकाणी हे लोकेशन दाखवण्यात येत आहे.

दरम्यान, दोन दशकांपासून वादग्रस्त बाबरी मशिदीच्या जागेवर हिंदु्त्वादी संघटना त्या ठिकाणी राम मंदिर व्हावे अशी मागणी लावून धरत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी प्रभू रामाचा जन्म झाला होता. आताच शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे या संदर्भात अयोध्येला जाऊन आले आहेत.

Web Title: 'Mandir yahi banega' marker appears near Ram Janmabhoomi site on Google Maps