
कारसेवकपुरम मध्ये गेल्या दोन दिवसापासून वातावरण बदललं आहे. निकालामुळे सध्या काम थांबले आहे. आता 400 ऐवजी पाचशे-सहाशे कारागीर आणून हे काम सुरू करण्यात येणार आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आले.
अयोध्या : रामजन्मभूमीमध्ये नियोजित राम मंदिर उभारण्यासाठी दगडांवर 65 टक्के कोरीव काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अयोध्येतील प्रवक्ते प्रवक्ते शरद शर्मा यांनी 'सकाळ'शी बोलताना रविवारी सकाळी सांगितले.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
कारसेवकपुरममध्ये 1989 मध्ये शीला पूजन झाल्यानंतर दगड घडविण्यास प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत येथे गुजरात आणि राजस्थानमधून येणाऱ्या दगडांवर नक्षीदार कोरीव काम करून त्यातून खांब, कमानी तयार करून ते कारसेवकपुरममध्ये ठेवण्यात आले आहे. मंदिराचा नियोजित आराखडा तयार करन येथे ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने आता रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यामुळे मंदिराच्या कामाला वेग येईल, असे शर्मा यांनी सांगितले. मंदिर उभारणीसाठी सुरूवातीला दान, देणगी याच्या माध्यमातून निधी संकलन होत, परंतु आता भाविक स्वेच्छेने मोठ्या प्रमाणात निधी देतात त्यामुळे मंदिरासाठी निधीचा प्रश्न कधीच संपलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
संजय राऊत यांचे पुन्हा ट्विट आणि पुन्हा...
कारसेवकपुरम मध्ये गेल्या दोन दिवसापासून वातावरण बदललं आहे. निकालामुळे सध्या काम थांबले आहे. आता 400 ऐवजी पाचशे-सहाशे कारागीर आणून हे काम सुरू करण्यात येणार आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आले.
रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यामुळे मंदिराच्या कामाला आता नक्कीच वेळ आल्याचं चित्र कारसेवकपुरमला भेट दिल्यानंतर दिसून आले.