
राऊत यांनी स्वतःला खानदारी समजून आम्ही मिजाज राखत असल्याचे म्हटले आहे. तर, तुमच्या वागण्यावरून तुम्हाला मिळालेली दौलत नवी-नवी आहे असा कोणाला टोला हाणला आहे हे स्पष्ट आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (रविवार) सकाळी पुन्हा एकदा ट्विट करत त्यामधून सूचक भाष्य करून टीका केली आहे.
जो खानदानी रईस हैं वो
मिजाज रखते हैं नर्म अपना,
तुम्हारा लहजा बता रहा है,
तुम्हारी दौलत नई-नई है।— Sanjay Raut (@rautsanjay61) November 10, 2019
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून विविध प्रसिद्ध कवींच्या कवितांचे आधार घेऊन ट्विट करत आहेत. आज सकाळीही त्यांनी एक कविता ट्विट करून मित्रपक्ष भाजपचे नाव न घेता सूचक शब्दांत टीका केली आहे. राऊत यांनी म्हटले आहे, की जो खानदानी रईस है वो मिजाज रखते है नर्म अपना, तुम्हारा लहजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई-नई है!
शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक; काय होणार निर्णय
यावरून राऊत यांनी स्वतःला खानदारी समजून आम्ही मिजाज राखत असल्याचे म्हटले आहे. तर, तुमच्या वागण्यावरून तुम्हाला मिळालेली दौलत नवी-नवी आहे असा कोणाला टोला हाणला आहे हे स्पष्ट आहे.
सत्तास्थापनेसाठी मिळालं भाजपला निमंत्रण; आज बैठक
दरम्यान, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर आज (रविवार) शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून, सरकार स्थापनेबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.