निवडणूक पुढे ढकलण्याची मणिपूरमध्येही मागणी

Manipur Assembly election
Manipur Assembly electionsakal

इम्फाळ : पंजाबमधील निवडणुकीची तारीख पुढे ढकलल्यानंतर आता मणिपूरमध्येही निवडणूकीची तारीख पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. रविवार हा ख्रिस्ती समाजाचा प्रार्थनेचा दिवस असल्याने धार्मिक भावना लक्षात घेऊन मतदानाची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे. (Manipur Assembly election)

Manipur Assembly election
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार - वर्षा गायकवाड

मणिपूरमध्ये ६० जागांसाठी २७ फेब्रुवारी आणि तीन मार्च अशा दोन टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. यापैकी २७ फेब्रुवारीला रविवार आहे. या राज्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या अधिक आहे. रविवार हा ख्रिस्ती समाजाचा प्रार्थनेचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी मतदान न ठेवता तारीख बदलून द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचेही प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष के. मेघचंद्र यांनी सांगितले. रविवारीच मतदान ठेवल्यास अनेक लोक मतदानापासून पाठ फिरवतील, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. मणिपूरमधील ६० जागांपैकी २० जागा ख्रिस्तीबहुल भागांतील अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत.

निवडणूकीची तारीख बदलण्याची मागणी नागा पीपल्स फ्रंट या पक्षानेही केली आहे. हा पक्ष भाजपबरोबर सध्या सत्तेत आहे.

Manipur Assembly election
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार - वर्षा गायकवाड

जोयकिशन यांना डच्चू

मणिपूरचे आमदार के.एच. जोयकिशन सिंह यांची पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मणिपूर प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस हरेश्‍वर गोस्वामी यांनी यासंदर्भातील निवेदन जारी केले आहे. शिस्तभंगाची कारवाईतंर्गत सिंह यांच्याविरोधात कारवाई केल्याचे म्हटले आहे. त्यांचे प्राथमिक सदस्यत्त्व तात्काळ रद्द करण्यात आले आहे. ते २०१७ च्या थंगमीबंद मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com