मणिपूर बनावट चकमकप्रकरणी दोन आरोपपत्र दाखल 

पीटीआय
मंगळवार, 31 जुलै 2018

नवी दिल्ली (पीटीआय) : लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिस यांच्या कथित बनावट चकमकप्रकरणी दोन आरोपपत्र दाखल केले असल्याची माहिती आज सीबीआयचे संचालक अलोक कुमार वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिली. तसेच विविध प्रकरणाशी संबंधीत पाच अंतिम अहवाल येत्या 31 ऑगस्टला सादर केला जाईल, अशीही माहिती न्यायालयाला देण्यात आली. 

मणिपूरच्या बनावट चकमक प्रकरणाच्या तपासाला विलंब होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. न्यायाधीश एम. बी. लोकूर आणि यू. यू. ललित यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली. सीबीआयने न्यायालयाला तपासाच्या प्रगतीबाबत सांगितले की, मणिपूरमधील बनावट चकमकप्रकरणी आतापर्यंत चौदा जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यात खुनाचा गुन्हा, गुन्ह्याचा कट आणि पुरावा नष्ट करणे यासारखे गंभीर गुन्हे लावण्यात आले आहेत. मणिपूरमधील बनावट चकमकीचे 1 हजार 528 प्रकरणे असून, त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी तपासासाठी गेल्यावर्षी 14 जुलैला एसआयटी नेमण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआयच्या संचालकास न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यादरम्यान, आणखी दोन आरोपपत्र लवकरच दाखल करणार असल्याचे ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. तपासादरम्यान आपल्याला ज्या काही अडचणी येत आहेत, त्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करू शकता, असे न्यायालयाने सीबीआयला सांगितले. आपण सामान्य नागरिकांच्या निगडित प्रश्‍नाची सोडवणूक करत असल्याचे न्यायालयाने सीबीआयला म्हटले आहे. 

Web Title: Manipur filed two chargesheets in the fake encounter case