नितीश कुमारांना पुन्हा धक्का; मणिपूरमध्ये जेडीयूचे 5 आमदार भाजपमध्ये

Nitish Kumar
Nitish Kumarsakal

मणिपूर : मागच्या काही दिवसांत बिहारमध्ये जेडीयूचे (जनता दल युनायटेड) अध्यक्ष नितीश कुमार यांनी भाजपसोबतची आपली युती तोडत आरजेडीसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर जेडीयूचे अनेक आमदार भाजपच्या वाटेला गेले आहेत. जेडीयूला (राष्ट्रीय जनता दल) अरूणाचलप्रदेशमध्येही मोठा झटाका बसला होता. त्यानंतर मणिपूरमधील ६ पैकी पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

(Manipur Politics Latest Updates)

मागच्या महिन्यात बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू (जनता दल युनायटेड) यांची युती तुटली आणि नितीश कुमारांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आरजेडीसोबत आपले सरकार स्थापन केले. महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी आपल्या पक्षात फूट पडू नये म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर जेडीयूमधील काही आमदार नाराज झाले असून त्यांनी आपली भाजपवारी सुरू केली आहे.

Nitish Kumar
PMC : पुणे महापालिकेचे दोन भाग होणार? फडणवीस थेट बोलले

जेडीयू होता सर्वांत मोठा तिसरा पक्ष

मणिपूरमध्ये ६० सदस्यीय विधानसभा असून तेथे भाजप हा सर्वांत मोठा पक्ष आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ३२ जागा जिंकल्या आणि आपली एकहाती सत्ता स्थापन केली. त्यावेळी जेडीयूने ६ जागा जिंकत राज्यातील तिसरा सर्वांत मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला होता.

एकच आमदार शिल्लक

केएच जॉयकिशन, एन सनाते, मोहम्मद अछाबुद्दीन, माजी पोलीस महासंचालक एएम खोटे आणि थंगजाम अरुणकुमार अशी या पाच आमदारांची नावे असून जेडीयूत एकच आमदार शिल्लक राहिला आहे. अब्दुल नसीर हे मणिपूरमधील जेडीयूचे एकमेव आमदार पक्षात शिल्लक राहिले असून या पाच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Nitish Kumar
सिन्नरमध्ये पुराचा कहर! उभी पिके, घरे पाण्यात; क्षणात होत्याचं नव्हतं झालं

अरूणाचलप्रदेशमध्येही जेडीयूला धक्का

बिहारमध्ये नितीश कुमारांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर अरूणाचलप्रदेशमध्येही जेडीयू भाजपचा पाठिंबा काढून घेण्याची चिन्हे होती. त्याअगोदर भाजपने खेळी खेळत जेडीयूचे काही आमदार आपल्या गळाला लावत हा प्लॅन मोडीस काढला होता. त्यामुळे बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर जेडीयूला बसलेला हा मोठा धक्का आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com