Manipur violence
esakal
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या विविध घटनांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यावेळी जवळपास १४ घरांना आग लावण्यात आली. या घटनांमुळे दोन समुदायांमधील तणाव वाढला आहे. परिस्थिती गंभीर बनल्याने कांगपोकपी जिल्ह्यात २४ तासांच्या बंदची हाक देण्यात आली आहे.