Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं, उखरुलमध्ये गोळीबार, जाळपोळ; ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद

Ukhrul District Clash : हिंसाचारामुळे शेकडो कुकी व तंगखुल नागा ग्रामस्थांनी गावं सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन केलं. किमान २१ घरे जळाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
Manipur Violence : मणिपूर पुन्हा पेटलं, उखरुलमध्ये गोळीबार, जाळपोळ; ५ दिवसांसाठी इंटरनेट बंद
Updated on: 

मणिपूरमधील उखरुल जिल्ह्यात मंगळवारी सकाळी तंगखुल नागा समुदायाच्या सदस्यावर झालेल्या कथित हल्ल्यावरून हिंसाचार उसळला, ज्यामुळे अनेक मोकळ्या घरांना आग लागली आणि गोळीबार करण्यात आला. परिस्थितीला आणखी चिगळू नये म्हणून राज्य सरकारने जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, उखरुल आणि कामजोंग जिल्ह्यात कुकी समुदायाच्या हालचालींवर दोन तंगखुल नागा संघटनांनी निर्बंध लादल्यानंतर दुसऱ्या दिवशी लिटन सारीखोंग परिसरात गोळीबार आणि जाळपोळ झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com