
बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी भाजप नेते आणि युट्यूबर मनीष कश्यप यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. रविवारी त्यांनी फेसबुकवर लाइव्ह येत राजीनाम्याची घोषणा केली. मनीष यांनी सांगितलं की, मी आता भाजपचा सक्रीय सदस्य नाही. भाजपमध्ये राहून मी स्वत:ला वाचवू शकलो नाही तर लोकांची काय मदत करणार?