
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दरम्यान, निवडणूक प्रचार रॅलीत राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुएल उरीबे तुर्बे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडलीय. मिगुएल उरीबे तुर्बे हे विरोधी पक्ष असलेल्या कंझर्वेटिव्ह डेमोक्रेटिक सेंटर पार्टीचे खासदार असून आगामी २०२६ च्या निवडणुकीसाठी ते राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत.