मंजू वर्मा न्यायालयास शरण

मंजू वर्मा न्यायालयास शरण

पाटणा : मागील अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बिहारच्या माजी समाजकल्याणमंत्री मंजू वर्मा यांनी आज येथील स्थानिक न्यायालयामध्ये शरणागती पत्करली. माध्यमांपासून तोंड लपविता यावे म्हणून वर्मा या आज बुरखा घालून न्यायालयामध्ये आल्या होत्या.

वर्मा यांनी शरणागती पत्कारताच पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतले. बालिकगृहातील अत्याचार प्रकरणात आरोपी असलेल्या वर्मा यांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी ढोल ताशांसह मिरवणूक काढत यासंबंधीची नोटीस त्यांच्या घरापर्यंत पोचविली होती. 

पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी वर्मा यांच्या घरावर छापा घातला होता, त्यानंतर त्यांच्या घरातून 50 काडतुसे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, या शस्त्र प्रकरणात मंजू वर्मा यांच्या पतीने 20 आक्‍टोबर रोजीच पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. वर्मा यांनी बेगुसराय जिल्ह्यातील मंझौल विभागीय न्यायालयामध्ये शरणागती पत्करली.

तत्पूर्वी अटक टाळता यावी म्हणून वर्मा उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते, पण त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आली होती. दरम्यान, मंजू वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर आता नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळामध्ये एक महिला मंत्री राहिलेली नाही. वर्मा या नितीश यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री होत्या. 

मधू सीबीआयसमोर हजर 

मुझफ्फरपूर येथील बालिकागृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणाचा सूत्रधार ब्रजेश ठाकूर याची महिला सहकारी मधू आज केंद्रीय अन्वेषण विभागासमोर (सीबीआय) हजर झाली.

बालिकागृहामध्ये आत काय सुरू होते हे आपल्याला ठावूक नव्हते असे तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले. माझा या बालिकागृहाशी कसलाही संबंध नसल्याने मला घाबरण्याचे काहीच कारण नाही. मी ठाकूरसाठी काम करत होते पण आता बालिकागृहामध्ये काय घडत होते हे मात्र मला ठावूक नव्हते असे तिने म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com