मनमाड-इंदूर मार्ग अखेर रुळांवर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : गेली किमान दोन-अडीच दशके फक्त रेल्वे अर्थसंकल्पात झळकणाऱ्या मनमाड-इंदूर हा बहुप्रतीक्षित लोहमार्ग अखेर प्रत्यक्ष कार्यवाहीच्या टप्प्यात आला आहे. पूर्णपणे ब्रॉडगेज असलेल्या या 362 किलोमीटरच्या या मार्गाच्या कामाचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. 

ते म्हणाले, की या मार्गाचे काम पूर्ण होण्यास सहा वर्षे लागणार आहेत. मात्र आगामी तीन ते चार वर्षांत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. या मार्गासाठी साडेआठ हजार कोटी रुपयांहून जास्त खर्च येणार आहे. त्यापैकी 5500 कोटींचे कर्ज 20 वर्षांच्या मुदतीने उपलब्ध करून दिले जाईल. या एकूण मार्गापैकी महाराष्ट्रात 186 किलोमीटर व मध्य प्रदेशात 176 किलोमीटरचा मार्ग असेल. यासाठी 2008 हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. यामुळे दिल्ली-चेन्नई व दिल्ली-बंगळूर हे अंतर किमान साडेतीनशे किलोमीटरने कमी होईल. या मार्गासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करणाऱ्यांत लोकसभाध्यक्षा व इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन व दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचा विशेषत्वाने समावेश आहे. गडकरी म्हणाले, की धुळ्याजवळ ड्राय पोर्ट उभारण्यात येणार आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कृषी विकासालाही चालना मिळेल. 

Web Title: Manmad-Indore railway track