Budget 2019 : अर्थसंकल्पाच्या भाषणात मनमोहनसिंगच आहेत 'किंग'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जुलै 2019

मनमोहनसिंग हे अर्थमंत्री असताना 1991मध्ये त्यांनी अर्थसंकल्प साजर केला. त्या वेळी त्यांनी केलेले भाषण सर्वांत मोठे होते. त्यात सुमारे 18,177 शब्द होते. अर्थमंत्री एच. एम. पटेल यांनी 1977मध्ये अर्थसंकल्प मांडताना सर्वांत छोटेखानी भाषण केले. त्यात केवळ 800 शब्दच होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा दुसरा केंद्रीय अर्थसंकल्प गुरुवारी सादर झाला. अर्थसंकल्पाच्या भाषणांच्या वेळेचा विचार केला तर मनमोहनसिंग यांचे भाषण सर्वांत दीर्घ ठरले. सर्वांत लहान भाषण एच. एम. पटेल यांनी दिले होते.

मनमोहनसिंग हे अर्थमंत्री असताना 1991मध्ये त्यांनी अर्थसंकल्प साजर केला. त्या वेळी त्यांनी केलेले भाषण सर्वांत मोठे होते. त्यात सुमारे 18,177 शब्द होते. अर्थमंत्री एच. एम. पटेल यांनी 1977मध्ये अर्थसंकल्प मांडताना सर्वांत छोटेखानी भाषण केले. त्यात केवळ 800 शब्दच होते.

देश स्वतंत्र झाल्यापासूनचा हा 88 वा अर्थसंकल्प होता. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या तीन पंतप्रधानांनी आतापर्यंत संसदेत अर्थसंकल्प सादर केले आहेत. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या पहिला व तमिळनाडूच्या सहव्या संरक्षणमंत्री आहेत. इंदिरा गांधी यांच्याकडे 1970 मध्ये पंतप्रधानपदाबरोबर अर्थमंत्रीपदाचा कार्यभारही होता. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरल्या. त्यानंतर 49 वर्षांनंतर आज अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या महिला अर्थमंत्री आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manmohan Singh logest speech on union budget