Mann Ki Baat :  चला जलसंकटावर मात करू : मोदी

वृत्तसंस्था
रविवार, 30 जून 2019

मोदींच्या नेतृ्तवाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या टप्प्यात जल संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीने जल संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मोदींच्या या पहिल्या मन की बात कार्यक्रमाला नागरिकांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक शहरांमध्ये हा कार्यक्रम ऐकण्यासाठी गर्दी झाली होती.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधताना सर्वांनी मिळून जलसंकटावर मात करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

मोदींच्या नेतृ्तवाखालील सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या टप्प्यात जल संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. लोकांचा सहभाग आणि सहाय्य यांच्या मदतीने जल संकटावर मात करू, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मोदींच्या या पहिल्या मन की बात कार्यक्रमाला नागरिकांना देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक शहरांमध्ये हा कार्यक्रम ऐकण्यासाठी गर्दी झाली होती.

मोदी म्हणाले, की सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये पाणी टंचाईच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. पाण्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून या माध्यमातून पाण्याच्या समस्येशी संबंधित निर्णय तातडीने घेतले जातील. स्वच्छता आंदोलनाप्रमाणेच आता लोक गावागावात जलमंदिर तयार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. जल संरक्षणाच्या प्रयोगांचा अभ्यास करुन त्यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांच्या कामाचं कौतुक होणे गरजेचे असून त्याबद्दलच्या माहितीची देवाणघेवाण व्हायला हवी.

22 जूनला देशातील हजारो ग्रामपंचायतींनी जल संरक्षणाचा संकल्प केल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी झारखंडच्या हजारी बागमधील एका सरपंचाचा संदेशदेखील ऐकवला. पंतप्रधानांनी मला पाण्याच्या संरक्षणासाठी पत्र लिहिलं, यावर माझा अद्यापही विश्वास बसत नसल्याचं या संदेशात संबंधित सरपंचाने म्हटले होते. पाण्याचे संरक्षण करण्याचा संकल्प केलेल्या सर्व सरपंचांना मोदींनी मन की बातमधून शुभेच्छा दिल्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mann Ki Baat as India Stares at Crippling Water Crisis