पर्रीकरांनी स्वतः केली तिसऱ्या मांडवी पुलाची पाहणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 डिसेंबर 2018

पणजी : गेल्या फेब्रुवारीपासून आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे शनिवारपासून ( १५ ) सक्रिय झाले आहेत. आज (रविवार) त्यांनी मांडवी नदीवरील तिसऱ्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अभियंत्यांना काही सूचना केल्या. हा पूल येत्या जानेवारीच्या मध्यास खुला होणार असल्याचे सांगितले. या कृतीतून त्यांनी त्यांच्या प्रकृतीवर शंका घेणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.

शनिवारी पर्रीकर यांनी दक्षिण गोव्यात कुंकळी येथे " राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेची पायाभरणी आपल्या निवास्थानाहून केली होती . पर्रीकर आजारी असल्याने ते काहीच काम करू शकत नसल्याचा आरोप विरोधीपक्ष करत होते. काँग्रेसने गेल्या दोन महिन्यात आंदोलने करीत भाजपने मुख्यमंत्री बदलावा अशी मागणी केली होती. राज्यपालांकडे निवेदने सादर करून आजारी मुख्यमंत्री बदलावा असा आग्रह धरला होता.

अॅड. आयरिश रोड्रीगिज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सरकारने पर्रीकर यांच्या आजाराची माहिती उघड करावी अशी मागणी करत याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य सचिवांनी सीलबंद अहवाल सादर करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पर्रीकर यांनी गेले दोन दिवस सक्रियता दाखवून त्यांच्यावर संशय घेणाऱ्यांवर यातून चांगलेच उत्तर दिले.

Web Title: Manohar Parrikar examined the third Mandvi bridge