नूतन वर्षाचा मुहूर्त साधत पर्रीकरांचे मंत्रालयात पाऊल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पणजी : नववर्षाचा मुहुर्त साधत साडेतीन महिन्यांच्या खंडानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर मंगळवारी मंत्रालयातील आपल्या कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी विधानभवनातील सर्व कर्मचारी वर्ग लोटला होता. सचिवालयात त्यांचे स्वागत सभापती प्रमोद सावंत, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी केले. 

गतवर्षी 2018 मध्ये सप्टेंबर महिन्यात चतुर्थी सणावेळी पहिल्या पंधरवड्यात मुख्यमंत्री आपल्या कार्यालयात आले होत. गणेशोत्सव काळातच पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने ते कांदोळी येथील आपल्या पाहुण्यांच्या रुग्णालयात दाखल झाले होते. गणेशोत्सव काळात त्यांनी पर्रा येथील आपल्या मूळ घरी जाऊन गणेश दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलविले होते. एम्स रुग्णालयातून परतल्यानंतर ते सचिवालयात आलेच नाहीत. त्यामुळे विरोधकांनी मुख्यमंत्री घरी बसून काम करीत असल्याचा तथापि त्यांच्या सह्या कोणीतरी भलतीच व्यक्ती करीत असल्याचा आरोप करून जोरदार रान पेटविले होते. एनआयटीच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांनी घरीच केले होते. त्यानंतर त्यांचा मांडवी व झुआरी पुलाची केलेली पाहणी दौराही वादातीत राहिला. विरोधकांनी त्यांच्या पुलावर येण्यावर प्रश्‍न उपस्थित केले. 

दरम्यान, मंगळवारी नववर्षाचा मुहुर्त साधत मुख्यमंत्री पर्रीकर सकाळी सचिवालयात पाऊल टाकले. पर्रीकर येणार असल्याची कल्पना पर्रीकर अवघ्याच कर्मचाऱ्यांना असली तरी ही वार्ता वाऱ्यासह सर्वत्र पसरली आणि त्यांना पाहण्यासाठी सर्व कर्मचारी वर्ग कार्यालयाबाहेर जमा झाला.

Web Title: Manohar Parrikar rejoins Goa Mantralaya after 3 months