विचित्र योगायोग; पर्रीकरांच्या पत्नीचेही झाले होते कर्करोगाने निधन

parrikar
parrikar

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काल (ता. 17) निधन झाले. मागील वर्षभर त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. यावेळी एक विचित्र योगायोग समोर आला, तो असा की, त्यांच्या पत्नीचेही 2001 मध्ये कर्करोगानेच निधन झाले होते. मनोहर पर्रिकर यांच्या पत्नी मेधा पर्रीकर यांनाही कर्करोग झाला होता व आता मनोहर पर्रीकरांचेही कर्करोगाने निधन झाले. यावेळी या प्रसंगाची आठवण झाली.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे फेब्रुवारी 2018 मध्ये उघडकीस आले. त्यानंतर त्यांना सुरवातीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात व नंतर अमेरिकेत उपचारांसाठी नेण्यात आले होते. तेथून उपचार घेऊन ते गोव्यात परतले होते. दोन महिन्यांपूर्वी 27 जानेवारी रोजी मांडवी नदीवरील नव्या पुलाच्या, "अटल सेतू'च्या उद्‌घाटनालाही ते नाकाला नळी लावलेल्या स्थितीत उपस्थित होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी उरी चित्रपटातील "हाऊ इज द जोश?' हा प्रश्‍न विचारला. त्याला विद्यार्थ्यांनीही "हाय सर' असे उत्स्फूर्त उत्तर दिले होते.  

गेल्या दोन दिवसांपासून पर्रीकर यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना "व्हेंटिलेटरवर' ठेवण्यात आले होते. काल संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावली. गोमेकॉ इस्पितळाच्या डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचारांची शर्थ केली; परंतु त्यात यश आले नाही. पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताळगाव येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी सरकारमधील मंत्री, आमदार, भाजप नेते, तसेच मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांनी धाव घेतली. पर्रीकर यांच्यामागे दोन चिरंजीव आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com