लष्कराच्या सर्वोच्चपदी मराठी माणूस; मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख

वृत्तसेवा
सोमवार, 16 डिसेंबर 2019

  • लष्करप्रमुखपदावर नरवणे यांची निवड

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्करप्रमुखपदासाठी नियुक्ती झाली आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत हे 31 डिसेंबरला निवृत्त होत असून, त्यानंतर नरवणे पदाची सूत्रे स्वीकारतील. शीख लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटचे जवान असलेल्या नरवणे यांची लष्करात 37 वर्षे सेवा झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लष्कराच्या उपप्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी लेफ्ट. जनरल नरवणे हे लष्कराच्या पूर्व विभागाचे प्रमुख होते. मनोज नरवणे हे ७ शीख लाईट इन्फंट्रीमध्ये १९८० साली भरती झाले होते. लष्करप्रमुखपदी पोचलेले तिसरे महाराष्ट्रीय ते आहेत. या आधी जनरल अरूणकुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखपद भुषवलं होतं. पुणे शहराशी त्यांचे नातं असून पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेचे ते माजी विद्यार्थी आहेत. १९७६च्या दहावीच्या तुकडीचे ते विद्यार्थी होते.

खूशखबर ! ही कंपनी करणार २३००० कर्मचाऱ्यांची भरती

नव्या वर्षात नरवणे हे नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील. महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे. नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणजे मनोज नरवणे हे आहेत.

मुंबई लोकलचा आणखी एक बळी

नरवणे यांचे वडील हवाईदलात अधिकारी होते. नरवणे यांनी युद्ध, शांतताकालीन काम आणि दहशतवादाने ग्रस्त असलेल्या क्षेत्रात उत्तम काम केलंय. त्यांना आत्तापर्यंत परमविशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेना पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. नरवणे हे देशाचे २८ वे लष्कर प्रमुख असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Manoj Mukund Naravane To Be Next Army Chief of India