खूशखबर ! 'ही' कंपनी करणार २३,००० कर्मचाऱ्यांची भरती

वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

  • अर्न्स्ट अँड यंग करणार 23,000 कर्मचाऱ्यांची भरती, भारतीयांना मोठी संधी

नवी दिल्ली : अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) ही जगातील सर्वात मोठ्या प्रोफेशनल सर्व्हिसेसपैकी कंपनी लवकरच 23,000 कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. जगभरातील कंपनीच्या केंद्रांसाठी (ग्लोबल डिलिव्हरी सर्व्हिसेस) आणि सदस्य कंपन्यांसाठी अर्न्स्ट अँड यंग ही कर्मचारी भरती करणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही भरती मुख्यत: तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी असणार आहे. ईवायने याआधीच चालू आर्थिक वर्षासाठी 11,000 प्रोफेशनलची भरती केली आहे. पुढील वर्षी 30 जूनपर्यत आणखी 12,000 प्रोफेशनलची भरती करण्याचे कंपनीचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळावर यासंदर्भातील माहिती आली आहे.

रजनीकांत यांना मराठीत बोलताना पाहिलंय का?

ईवायचे मुख्यालय लंडन येथे आहे. जुलै ते जून असे ईवायचे आर्थिक वर्ष असते. सर्वच क्षेत्रात रोजगार निर्मितीचा दर घटलेला असताना ईवायने मात्र कर्मचारी भरतीत वाढ केली आहे. कंपनीचे भारतात 50,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आमच्या जगभरातील व्यवसायाला सेवा पुरवण्यासाठी भारत हे आम्हाला महत्त्वाचे ठिकाण वाटते.

ऐश्वर्या राय विरोधात सासूकडून एफआयआर दाखल 

तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि हुशार मनुष्यबळ या सर्वच आघाड्यांवर भारत हे योग्य ठिकाण आहे, असे मत कंपनीने व्यक्त केले आहे. ईवायकडून भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मुख्यत: विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयाशी संबंधित प्रोफशनलचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ernst and Young to hire 23000 people in 2020 in India