

Manoj Mukund Naravane Says China Is India’s Main Competitor
esakal
Manoj Mukund Naravane Says China Is India’s Main Competitor : भारतीय लष्कराचे माजी प्रमुख मनोज मुकुंद नरवणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यात गुरुवारी त्यांच्या ‘द क्युरिअस अँड द क्लासिफाइड: अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्यात नरवणे यांनी भारतासमोरील भविष्यातील सुरक्षा आव्हाने, चीन-पाकिस्तान संबंध आणि लष्करी सज्जतेबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले.