esakal | अमित शहांचा फोटो घेऊन मनोज तिवारी पोहोचले मंदिरात...
sakal

बोलून बातमी शोधा

manoj tiwari offers prayer at temple for amit shah speedy recovery

भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र घेऊन मंदिरात गेले. शहा यांच्या प्रकृतीत लवकर सुधारण होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अमित शहांचा फोटो घेऊन मनोज तिवारी पोहोचले मंदिरात...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी हे गृहमंत्री अमित शहा यांचे छायाचित्र घेऊन मंदिरात गेले. शहा यांच्या प्रकृतीत लवकर सुधारण होण्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. संबंधित छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

तिवारी यांनी दिल्लीच्या आरके पुरम येथील शिवमंदिरात जाऊन पूजा केली. यादरम्यान त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि त्यांना उपचारांसाठी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशभरात शहा यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे. तिवारी यांनीही प्रार्थना केली.

श्रीनगर-बारामुल्ला महामार्गावर टळली दुर्घटना...

दरम्यान, शहा यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती एका ट्वीटद्वारे दिली. त्यांनी सांगितले की, प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती, ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही आपापली चाचणी करण्याची विनंती केली. शहा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोरोनाविरोधी लढ्यात अमित शहा सातत्याने सक्रीय राहिले आहेत. दिल्लीत कोव्हिड-19ची स्थिती गंभीर झाल्यानंतर त्यांनी दिल्ली सरकारला मदत केली. शहा यांनी दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांशी बैठक करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठीचे निर्देश दिले होते. गृहमंत्र्यांनी दिल्लीतील रुग्णालयांचा दौरा करून परिस्थितीचा अंदाज घेतला आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह सातत्याने बैठका घेतल्या. शिवाय, अनलॉकसाठीचे दिशानिर्देश तयार करण्यातही त्यांनी मोठी भूमिका बजावली.

'कोरोना करी’ आणि ‘मास्क नान’चा अहवाल पॉझिटिव्ह...